‘लॉकडाऊन’ : करोनामुळे माणसांमधला स्वकेंद्रितपणा अधिक गडद झाला आणि ही कादंबरी तो तीव्रतेनं मांडते
संदेश शिंदे हा ४७ वर्षीय इंजिनिअर त्याच्या कुटुंबाच्या आयुष्यात करोनामुळे उदभवलेल्या दुःखद प्रसंगांचं निवेदन करतो. संदेशचं कुटुंब प्रातिनिधिक आहे. खरं तर अशी हजारो कुटुंबं करोनामुळे उदध्वस्त झाली आहेत. त्यांची वाताहत ही भारतासारख्या महाकाय देशातील वाताहतीचं लघुरूपच आहे! हे सगळं वाचताना आपण अस्वस्थ होतो. जणू हे सगळं आपल्या समोर आणि आपल्याच बाबतीत घडतंय असं वाटत राहतं.......